*कोकण Express*
*कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दणदणीत विजय*
*शेकाप, महाविकास आघाडीला धक्का*
कोकण शिक्षक विधान परिषद मतदारसंघात भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दणदणीत मताधिक्याने विजय झाला आहे.शेकापचे महाविकास आघाडी समर्थित उमेदवार मावळते आमदार बाळाराम पाटील यांना मोठा पराभव पत्करावा लागला आहे..ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २०,६४८ मते तर बाळाराम पाटील यांना ९,७६८ मते मिळाली आहेत.