*कोकण Express*
*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका वेंगुर्लाच्या वतीने शिष्यवृत्ती सराव परीक्षा पडली पार*
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका वेंगुर्लाच्या वतीने पूर्व माध्यमिक (इयत्ता ५ वी) व माध्यमिक ( 8 वी ) शिष्यवृत्ती सराव परीक्षा रविवार दिनांक २९/०१/२०२३ रोजी वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला येथे पार पडली.ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः मोफत घेण्यात आली होती.प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.या परीक्षेसाठी परीक्षा प्रमुख म्हणून शिक्षक परिषद जिल्हा महिला प्रमुख श्रीम.सुरेखा वि. शिंदे मॅडम (वेंगुर्ला हायस्कूल) यांनी काम पाहिले.यावेळी तालुक्यातील पूर्व माध्यमिक 88 तर माध्यमिक 65 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिषदेचे तालुका अध्यक्ष श्री. किशोर शां. सोनसुरकर(दाभोली हायस्कूल), उपाध्यक्ष श्री. सुनिल गंगाराम जाधव(आडेली हायस्कूल), सचिव श्री.अशोक काळे(तेंडोली हायस्कूल), सदस्य श्री. सुनिल जाधव(मठ हायस्कूल), श्री. रमेश वाघमारे(आरोंदा हायस्कूल), सौ. साक्षी वराडकर(आसोली हायस्कूल), सौ. स्वप्नाली मुननकर(पाटकर हायस्कूल), वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.पी. डि.कांबळे यांनी उत्तम सहकार्य केले.आणि स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. *स्पर्धेचा निकाल व्हॉट्स ॲप ग्रुपवर दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.* याची सर्वांनी नोंद घ्यावी.