*कोकण Express*
*कातवण मध्ये पकडली 30 हजारांची अवैध दारू ; एलसीबीची कारवाई*
*देवगड ः प्रतिनिधी*
तालुक्यातील कातवण वरचीवडी येथे स्थानिक गुन्हा अन्वेक्षण शाखा सिंधुदुर्ग यांनी गोवा बनावटीच्या ३०,हजार ९००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला .सदरची घटना सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास कातवण वरचीवडी येथे घडली .या घटनेसंदर्भात कॉन्स्टेबल रवी इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार देवगड पोलीस स्थांनकात संशयित आरोपी दिनेश केशव जोईल याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ ई नुसार कारवाई करण्यात आली आहे.जप्त केलेल्या मुद्देमाल मध्ये मॅकडॉल न.१ (२४ बाटल्या)रु ४८००/-,बॉब्ज लेमन व्होडका (७२ बाटल्या) ७२००/-,हायवॉर्डस फाईन व्हिस्की (१८९ बाटल्या),१८,९००/-,रु असा एकूण ३०,९००/- रुपयांचा गोवा बनवटीचा मद्यसाठा मुद्देमाल हस्तगत केला .
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण करीत आहेत.