एन.एच.६६ हायवे साळगाव जांभरमळा नजिक सामाजिक वनीकरणाच्या रोपांची नासधूस केलेल्या संबंधितावर तात्काळ कारवाई करा

एन.एच.६६ हायवे साळगाव जांभरमळा नजिक सामाजिक वनीकरणाच्या रोपांची नासधूस केलेल्या संबंधितावर तात्काळ कारवाई करा

*कोकण Express*

*एन.एच.६६ हायवे साळगाव जांभरमळा नजिक सामाजिक वनीकरणाच्या रोपांची नासधूस केलेल्या संबंधितावर तात्काळ कारवाई करा*

*आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..*

*कुडाळ (झाराप) : प्रतिनिधी*

झाराप ते कसाल एन.एच.६६ हायवेच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागाकडून झाडांची रोपे सुमारे पाच हेक्टर परिसरात २५०० रोपांची लागवड केलेली आहे साळगाव (कारगिल हॉटेल) नजिक अज्ञाताकडून १०० ते १५० रोपांचे जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण करून जमीनदोस्त करण्यात आले.या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस राकेश केसरकर, जिल्हा सचिव ऍड.मोहन पाटणेकर,बाळा कोरगांवकर ,आनंद कांडरकर,अमित देसाई, विष्णू चव्हाण,सुर्यकांत धुरी
उपस्थित होते.
सामाजिक वनीकरणा मार्फत लावण्यात येणाऱ्या रोपांची लागवड तसेच संरक्षण केले जाते.रोपांची वेळोवेळी काळजी घेतली जाते या वृक्षांपासून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मदत होते.अशी रोपांची नासधूस होत असेल तर याला जबाबदार कोण? कारवाई करून नुकसान भरपाई भरून घेणे गरजेचे आहे.अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद धुरी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!