*कोकण Express*
*कणकवली तालुक्यात शांतता राहावी, भिरवंडेच्या रामेश्वराकडे साकडं; संदेश पारकर*
कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथे श्री देव रामेश्वर याचा अखंड हरिनाम सप्ताहाला आजपासून सुरुवात आहे. या हरिनाम सप्ताहाला आमदार वैभव नाईक आणि शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी सप्ताहाला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांच्यासोबत तालुक्यातील पदाधिकारी देखील उपस्थित होते.
श्री देव रामेश्वर सप्ताह दरम्यान शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी रामेश्वराचे दर्शन घेऊन रामेश्वराकडे पारकर यांनी साकडे देखील घातला आहे. सध्या कणकवली तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने सत्तेचा उनमात दाखवला जात आहे. तालुक्यात गुंडगिरी सुरू आहे. अशा गुंडगिरीला आळा बसावा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली तालुक्यामध्ये शांतता राहावी अशा प्रकारचं मी साकडं रामेश्वराकडे घातले आहे. त्याचबरोबर सर्वांना सुख समृद्धी आरोग्य चांगल्या प्रकारे देव अशी सुद्धा प्रार्थना मी रामेश्वराकडे केले आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी दिली आहे.