*कोकण Express*
*कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी ९८.१७ टक्के मतदान*
*कणकवली, कासार्डे या दोन केंद्रांवर झाले उस्फूर्त मतदान;मतदान केंद्राबाहेर नेत्यांची हजेरी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकिसाठी आज रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.या निवडणकीसाठी आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.कणकवली तालुक्यातील कणकवली तहसीलदार व कासार्डे या दोन केंद्रांवर झाले उस्फूर्त मतदान मतदान झाले आहे.तालुक्यात ९८.१७ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार रमेश पवार यांनी दिली.
कणकवली मतदान केंद्रावर ३५९ मतदरांपैकी महिला १२३,पुरुष २२९ एकूण ३५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.त्यामुळे कणकवली बुथवर ९८.०५ टक्के मतदान झाले आहे.तर कासार्डे मतदान केंद्रावर ७९ मतदारांपैकी महिला २७ ,पुरुष ५१ एकूण ७८ त्यामुळे ९८.७३ टक्के मतदान झाले.त्यामुळे तालुक्यात ९८.१७ टक्के मतदान शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी झाले.
दरम्यान कणकवली येथील भारतीय जनता पार्टीच्या बुथवर जिल्हाध्यक्ष राजन तेली,माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार,जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर,नगराध्यक्ष समीर नलावडे,जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत,मनोज रावराणे,भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण,कणकवली नगरसेविका सौ
मेघा गांगण,बबलू सावंत व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
तर महाविकास आघाडीच्या बुथवर कोकण शिक्षक मतदार संघ निवडणूक पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या समर्थनार्थ आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. याप्रसंगी संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, बळीराम पाटील, सतीश म्हात्रे, कमलेश गोसावी, रुपेश आमडोसकर, तेजस राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.