*कोकण Express*
*देवगड अर्बन बँकेवर आ. नितेश राणे व नंदकुमार घाटे यांचे वर्चस्व!*
*सर्वसाधारण गटातून शिवम पॅनेलचे सर्व 8 उमेदवार विजयी*
*देवगड ः प्रतिनिधी*
आ. नितेश राणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या देवगड तालुक्यात आज दिनांक ३० जानेवारी रोजी पुन्हा एकदा देवगड अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आ. नितेश राणेंचे असलेले वर्चस्व सिद्ध झाले आहे.
अधिक बातम्यांसाठी वाचा/पहा
कणकवली तालुक्यात एअरटेल नेटवर्क पूर्ववत
देवगड तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अग्रणी दि देवगड अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि. देवगड या बँकेची पंचवार्षिक निवडणूकित भाजप राष्ट्रवादी आघाडीचे शिवम पॅनल विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेस आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल यांच्यात चुरशीची लढत होऊन अखेर सर्वसाधारण गटातून शिवम पॅनेलचे सर्वच्या सर्व ८ उमेदवार विजयी ठरले आहेत.
एकूण मतदान २८.९९% टक्के मतदान
दोन्ही गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. रविवारी पार पडलेल्या निवडणूकीत या बँकेचे एकूण ११५४३ सभासद मतदारांपैकी ३३४७ मतदारांनी मतदानादाचा हक्क बजाविला व एकूण मतदान २८.९९% टक्के मतदान झाले होते.रविवारी सकाळ पासून दोन्ही पॅनेलचे कार्यकर्ते व उमेदवार गटागटाने देवगड अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालयाबाहेर निकाल ऐकण्यासाठी गर्दी करून होते.
शिवम पॅनल सर्वसाधारण गट मध्ये किती उमेदवार आघाडीवर
शिवम पॅनल सर्वसाधारण गट (देवगड तालुका) सदाशिव पु. ओगले, (१९४५) प्रकाश बा. राणे, ( १८०८) अभय ज. बापट ( १९४३)), ऍड अभिषेक या. गोगटे, (१९३६) डॉ. अमोल ज.तेली,( १८४३) दिनेश नं. घाटे, (२०७२ ) समीर य. पेडणेकर ( १९३१) हे शिवम पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी ठरले आहेत. ,सर्वसाधारण गट देवगड तालुक्याबाहेरील उमेदवार अनिल उर्फ बंड्या सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. एकूण सर्वसाधारण गटातून ८पैकी ८ जागा शिवम पॅनेलने जिंकल्या आहेत.
८पैकी ८ जागा शिवम पॅनेलने जिंकल्या आहेत
सहकार समृद्धी पॅनल मधून सर्वसाधारण गटातून उल्हास क. मणचेकर ( ११५४) खान अब्दूलरशीद अली, ( ९९७) संतोष र. तारी, ( ११३१ ) किरण ह. टेंबुलकर, ( १०२७) रघुवीर शां वायंगणकर, ( ९५७) हे पराभूत झाले मतमोजणी ठिकाणी शिवम पॅनेलचे प्रमुख नेते ऍड अजित गोगटे, जिल्हा बँक संचालक ऍड प्रकाश बोडस, भाजप तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर यांच्या उपस्थितीत सर्व विजयी उमेदवार भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जल्लोष केला.