नववर्षाच्या स्वागतासाठी गृह विभागाची “बंधने”

नववर्षाच्या स्वागतासाठी गृह विभागाची “बंधने”

*कोकण Express*

*नववर्षाच्या स्वागतासाठी गृह विभागाची “बंधने”*

*सूचनांचे पालन करण्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांचे आवाहन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

नववर्षाच्या स्वागतासाठी कोरोना च्या पार्श्वभूमीवर कोणतेही धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात येऊ नयेत किंवा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत असा सूचना गृह विभागाकडून देण्यात आल्याची माहिती कणकवली पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली. गृह विभागाकडून परिपत्रक काढत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार नागरिकांनी घराबाहेर पडून मोठ्या प्रमाणात नववर्षाच्या स्वागतासाठी गर्दी न करता घरातच राहून साधेपणाने नव वर्षाचे स्वागत करावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता सॅनिटायझर व मास्क चा नियमित वापर करावा. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने 60 वर्षावरील नागरिक व 10 वर्षाखालील मुलांनी घरा बाहेर जाणे टाळावे नवीन वर्षाच्या स्वागताचा वेळी अनेक लोक धार्मिक स्थळाच्या ठिकाणी गर्दी करतात. त्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे. तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये. व ध्वनिप्रदूषणाच्या नियमाचे पालन करावे. तसेच शासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना, स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!