*कोकण Express*
*बॅ. नाथ पै जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कनेडी हायस्कूलचे सुयश*
*कोकण विभागाचे अग्रदूत म्हणून ज्यांनी महनीय कार्य केले अशा बॅ. नाथ पै यांच्या विषयी आपणा सर्वांनाच आत्यंतिक आदर आहे. त्यांच्या जीवनचरित्राचे व कार्याचे परिशिलन उमलत्या वयातील विद्यार्थ्यांकडून व्हावे व त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी या हेतूने नगर वाचनालय कणकवली तर्फे आयोजित जिल्हास्तरीय बॅ. नाथ पै वक्तृत्व स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी सानिका रामदास काळसेकर (१०वी) हिने तृतीय तर कु. मैत्रेयी मकरंद आपटे (इ. ८वी) हिने उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक प्राप्त करुन प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सदर स्पर्धा इ. ८वी ते १०वी या गटात घेण्यात आली. बॅ. नाथ पै यांचे सुसंस्कृत जीवन आणि आजचा समाज या विषयावर दोघींनीही अतिशय ओघवत्या शैलीत वक्तृत्व सादर करून उपस्थित रसिकांची व परीक्षकांची मने जिंकून घेतली. सदर यशाबद्दल त्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील १८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धा नगर वाचनालय कणकवली येथे संपन्न झाली. यापूर्वी सुद्धा दोघींनीही एकपात्री अभिनय, निबंध, वक्तृत्व, वादविवाद, चित्रकला, रांगोळी अशा अनेक स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत.*
*सदर यशाबद्दल कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे विद्यमान अध्यक्ष सन्मा. श्री. सतीशजी सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी कु. सानिका व मैत्रेयीचे अभिनंदन केले.*
*यशस्वी विद्यार्थिनींना प्रशालेतील संस्कृत तथा इंग्रजी विषय शिक्षक श्री. मकरंद आपटे, सहाय्यक शिक्षिका श्रीम. पल्लवी हाटले व प्रसाद मसुरकर यांचे मार्गदर्शन लाभले.