*कोकण Express*
*नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय भौतिकोपचार संमेलनामध्ये कुडाळ येथील बॅ.नाथ पै महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ सुरज शुक्ला यांचे २८,२९ जानेवारीला व्याख्यान*
नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय भौतिकोपचार संमेलनामध्ये कुडाळ येथील नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला यांचे २८,२९जाने.ला व्याख्यान होणार आहे .
महाराष्ट्र फिजिओथेरपी कौन्सिलचे अध्यक्ष डॉ संदीप काळे यांच्या पुढाकाराने नवी मुंबई येथे घेण्यात येणाऱ्या या आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये कोरोनानंतरच्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठीच्या तयारीच्या निमित्ताने चर्चा करण्यात येणार आहे .
सदर संमेलनामध्ये जगभरातील अमेरिका ,कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम तसेच जगातील विविध फिजिओथेरपिस्ट , आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या भौतिकोपचार संमेलनामध्ये कुडाळ येथील “आरोग्यम” या क्लिनिकचे डॉ. सुरज शुक्ला तथा बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरज शुक्ला हे व्याख्यान देणार आहेत. एक अभ्यासू ,सालस , अतिशय संयमी, सहकार्यशील असलेले डॉ.सुरज शुक्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागात शारीरिक दृष्ट्या विकलांग, समस्याग्रस्त व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांना उपचार देत असतात. असे सामाजिक बांधिलकीने काम करणारे सुरज शुक्ला हे अल्पावधीतच सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिजिओथेरपी क्षेत्रातील एक अभ्यासू, नावाजलेले डॉक्टर म्हणून उदयास येत आहे. त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा.