महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनाजिल्हा चिटणीसपदीवैभव मालंडकर यांची निवड…. !

*कोकण Express*

*महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनाजिल्हा चिटणीसपदीवैभव मालंडकर यांची निवड…. !*

*अध्यक्ष  निलेश उर्फ आप्पा पराडकर यांनी निवडीचे नियुक्तीपत्र  देत केले अभिनंदन … !*

*कणकवली ः प्रतिनिधी*  

महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेना या संघटनेच्यानेच्या  जिल्हा चिटणीसपदीवैभव मालंडकर यांची निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेना अध्यक्ष  निलेश उर्फ आप्पा पराडकर यांनी निवडीचे नियुक्तीपत्र,पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले आहे.
कलमठ येथील कार्यालयात  झालेल्या या निवडीवेळी हिंद भारतीय जनरल कामगार संघटनेचे सिंधूदुर्ग जिल्हा अध्यक्ष राजू शेट्ये,सरचिटणीस घनःश्याम नाईक,नयन यादव,नयन सुतार,सूरज सुतार,आतिष कांदळकर,प्रथमेश परब,सूरज घाग आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेवरून ,शिवसेना सचिव तथा खास. विनायक  राऊत ,यांच्या सल्यानुसार व संघटनेचे सरचिटणीस राजेश महाडिक यांच्यासुचनेनुसार हि निवड करण्यात आली आहे.           यावेळी बोलताना वैभव मालंडकर म्हणाले,दिलेल्या पदाचा महाराष्ट्रातील तमाम संघटित व असंघटित कामगार बंधू-भगिंनीचा उचित सन्मान करून त्याना न्याय देण्याच्या दृटीने प्रयत्न करू तसेच तालुक्यात संघटनावाढीसाठी मेहनत घेऊन संघटना बळकीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!