*कोकण Express*
*आमदार नितेश राणे यांच्या कार्याचा प्रभाव ; दारुम सरपंच,उपसरपंच,सदस्यांसह ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश*
* ग्रामविकास पॅनलमधून निवडून आली होती दारुम ग्रामपंचायत
*आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला पक्ष प्रवेश
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमदार नितेश राणे यांच्या कार्याच्या प्रभावाने कणकवली तालुक्यातील दारूम ग्रामपंचायत सरपंच तेशस्वी लिंगायत, उपसरपंच प्रवीण तळेकर व सदस्य अमित तळेकर,वैशाली कल्याणकर,सानिका राऊत,समृद्धी तावडे, प्रभावती चव्हाण,अशा संपूर्ण ग्रामपंचायत कार्यकारिणीने माजी सरपंच संतोष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रक्ष प्रेवश केला.
यावेळी माजी उप सरपंच अशोक गिरकर,माजी सदस्य किरण भोगले,ग्रामस्थ रवींद्र तळेकर, प्रमोद तळेकर, स्वप्निल तळेकर, प्रवीण तळेकर, सुरेंद्र तावडे, सदानंद राऊत, रोशन लिंगायत, योगेश लिंगायत, रोहन लिंगायत,विश्वनाथ तळेकर,प्रभाकर गुरव, यशवंत तळेकर, संतोष मोहिते , कल्पना तळेकर ,विजय मोहिते, राकेश तळेकर, अजित तळेकर, जनार्दन पवार, सत्यविजय गुरव, प्रभाकर तळेकर, संतोष वारीक, रवि भोगले,आदींसह असंख्य ग्रामस्थांनी पक्षात प्रवेश केला.
यावेळी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, भाजपा तालुका अध्यक्ष संतोष कानडे,मिलिंद मेस्त्री,राजू पेडणेकर, माजी उप सभाती प्रकाश पारकर,संतोष पारकर आशिये सरपंच महेश गुरव आदी उपस्थित होते.