वेंगुर्ले तालुक्यात कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना – महाराष्ट्र शिक्षक परिषद – मुख्याध्यापक संघाचा एकत्रित पणे मतदारांच्या गाठीभेटी

वेंगुर्ले तालुक्यात कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना – महाराष्ट्र शिक्षक परिषद – मुख्याध्यापक संघाचा एकत्रित पणे मतदारांच्या गाठीभेटी

*कोकण Express*

*वेंगुर्ले तालुक्यात कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना – महाराष्ट्र शिक्षक परिषद – मुख्याध्यापक संघाचा एकत्रित पणे मतदारांच्या गाठीभेटी*

*एकत्रित पणे प्रचार यंत्रणा राबविल्यामुळे मतदारांमध्ये चांगला संदेश*

कोकण शिक्षक मतदार संघाचे भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीचे व विविध संघटनांचा पाठींबा असलेले उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ले तालुक्यातील दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित पणे शाळांमध्ये जाऊन प्रचाराचा धडाका सुरू ठेवल्यामुळे विरोधी उमेदवाराचा पराभव दिसू लागला आहे . विरोधी उमेदवाराकडे वेंगुर्ले तालुक्यात स्थानिक शिक्षक प्रचारात नसल्याने अलिबाग वरुन कार्यकर्ते आणुन प्रचार करण्याची नामुष्की ओढवली आहे .
आज वेंगुर्ले तालुक्यातील न्यु.इंग्लिश स्कूल – उभादांडा , खर्डेकर महाविद्यालय , वेतोरे हायस्कूल , मातोंड हायस्कूल , जैतीर हायस्कूल – तुळस , विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल – रामघाट , अणसुर – पाल हायस्कूल तसेच वेंगुर्ले हायस्कूल इत्यादी शाळा – महाविद्यालयाला भेट देऊन प्रथम पसंतीचे मतदान ज्ञानेश्वर म्हात्रे यांना करावे असे आवाहन केले . त्यांना प्रत्येक शाळेत शिक्षक मतदारांचा उस्फुर्त पणे प्रतीसाद मिळत आहे .
आजच्या प्रचार फेरीत भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर , जिल्हा उपाध्यक्ष ॲड सुषमा खानोलकर , नगराध्यक्ष राजन गिरप , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , महीला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता दामले , शक्ती केंद्र प्रमुख ताता मेस्त्री , बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर , शहर प्रमुख उमेश येरम , महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाह सलिम तकिलदार , जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुरेखा शिंदे मॅडम , तालुका अध्यक्ष कीशोर सोन्सुरकर सर , तालुका उपाध्यक्ष सुनील गंगाराम जाधव सर , मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रमोद कांबळे सर , माजी मुख्याध्यापक एस्.एस्.काळे सर सर सहभागी झाले होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!