*पुरवठा निरीक्षक यांच्या वाढत्या तक्रारी दखल घेत पुरवठा निरीक्षक अखेर बदली*
*बाळासाहेबांची शिवसेनेने तहसीलदार यांच्याकडे केली होती बदलीची मागणी*
*देवगड ः प्रतिनिधी*
पुरवठा निरीक्षक यांच्या वाढत्या तक्रारी चीत्रास चालू होता सर्वजण खासगीत चर्चा करत होते परंतु कुणीही धडक कारवाई करण्यास धजावत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पदाधिकारी यांनी पंधरा दिवसांपूर्वी तहसील कार्यालयात निवेदन दिले होते.व कारवाईची मागणी केली होती त्याच प्रमाणे पूरळ विभागाचे बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिवसेना पक्षांचे पदाधिकारी गणेश किर यांनी आवाज उठवून दाद मागितली याची दखल घेऊन प्रशासनाने पुरवठा निरीक्षक यांची बदली संजय गांधी निराधार योजना विभागात केली आहे. व पुढील चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. त्यांनी प्रजासत्ताक दिनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण केले. त्यांच्या सोबत मिठबाव विभाग प्रमुख रमेश तारी तुषार पेडणेकर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सायंकाळी जिल्हाधिकारी प्रशासनाने यांनी दखल घेऊन लेखि पत्र दिल्यानंतर गणेश किर यांनी आपले उपोषण थांबविले.त्यावेळी देवगड तहसीलदार स्वाती देसाई यांचे मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार विवेक शेट यांनी उपोषण कर्ते याना भरलेला पाण्याचा ग्लास देऊन लेखी पत्र दिले.या वेळी उपोषण स्थळी महसूल पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
उपोषण स्थळी देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री पुजारे पोलीस कॉन्स्टेबल ए. जे जाधव यांनी बंदोबस्त ठेवला होता.