*कोकण Express*
*ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र ऑफलाइन पद्धतीने स्वीकारणार*
*निवडणूक आयोगाच्या जिल्हाधिकार्यांना सूचना*
*नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास आज सायंकाळी 5.30 वाजेपर्यत मुदतवाढ*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सादर करण्यात येणारी संगणकीकृत प्रणालीद्वारे नामनिर्देशन पत्रे पारंपरिक (ऑफलाइन मोड) द्वारे स्वीकारण्याचे आदेश निवडणूक आयोगाने जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. संगणकीकृत प्रणालीद्वारे नामनिर्देशन पत्र ऑनलाइन सादर करताना सर्व्हर डाऊन, नेटवर्क स्लो आदी समस्येमुळे निवडणूक लढविण्यापासून ग्रामपंचायत उमेदवार वंचित राहू नये या दृष्टीने निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. 28 डिसेंबर पासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना संगणकीकृत प्रणालीद्वारे नामनिर्देशन पत्र सादर करताना अडचणी येऊ लागल्या होत्या. त्यामुळे 30 तारीख रोजी संध्याकाळी 5.30 वा. पर्यत नामनिर्देशन पत्रे पारंपारिक म्हणजेच ऑफलाईन मोड पद्धतीने स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. पारंपारिक पद्धतीने (ऑफलाइन मोड) द्वारे स्वीकारलेली नामनिर्देशन पत्राच्या छाननी प्रक्रियेनंतर वैध नामनिर्देशन पत्र आर ओ लॉगीन वरून संगणक प्रणाली मध्ये भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.