*कोकण Express*
*शिवसेना यापुढे गुंडगिरीला अशाच प्रकारे ठेचणार; संदेश पारकर*
कणकवली तालुक्यातील कनेडी येथे शिवसैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करत आहे. ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा उन्नमात दाखवला. आणि शिवसैनिकांना मारहाण करण्यात आली.याचा मी जाहीर निषेध करतोय. कुंभवडे येथील माजी सरपंच तावडे यांना ओरोस येथे सिव्हील हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी मी विचारपूस केली. त्यांचा त्या हल्ल्याशी काही संबंध नव्हता .ते शिवसेनेच्या शाखेमध्ये माजी सरपंच म्हणून आले होते.अकस्मात त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला त्याच्यामध्ये ते गंभीर रित्या जखमी झाले आहेत त्यांच्या हाताला दुखापत झाली असून डोक्याला गंभीर मार बसला आहे. भरपूर रक्तस्राव झाल्याने अजूनही त्यांना चक्कर ओमिटी होत आहे. मी त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथल्या डॉक्टर श्रीपाद पाटील, हॉस्पिटलचे डीन गुरव, सर्व वैद्यकीय अधिकारी त्यांची भेट घेतली. त्या ठिकाणी तावडे यांची तपासणी सुद्धा डॉक्टरांनी केली. त्यांच्यावर त्या ठिकाणी योग्य तो उपचार करण्यासाठी निर्णय झाला.
कनेडी येथे घडलेली घटना अतिशय चुकीची आहे . आणि लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारचा हल्ला होणे फार चुकीचा आहे .आधी तावडे यांनी बरं व्हावं त्याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत सरकारी हॉस्पिटलमध्ये योग्य ते उपचार होत नसतील तर त्यांना खाजगी दवाखान्यामध्ये सुद्धा हलवण्यात येईल आजच्या घडीला त्यांचे वय हे 65 वर्ष असून अशा ज्येष्ठ लोकप्रतिनिधींना मारहाण झाली त्यातली जी गंभीर बाब आहे ती मी डॉक्टरांच्या निदर्शनात आणून दिली त्यांच्यावर चांगले आणि योग्य उपचार करू अशी ग्वाही डॉक्टरानी यांनी दिली.
पुढील जो पोलिसांचा कायदेशीर तपासाचा भाग होणार आहे, गंभीर रित्या मारहान झालेल्या व्यक्तींचा पोलीस योग्य तो तपास करतील. आणि त्या तपासामध्ये नेमकं काय घडलं हे समोर उघड होईल त्यानंतर समजेल की या तपासामध्ये यांचा काही संबंध आहे का? याचा सुद्धा तपास होईल या आल्यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा मी बोललो आहे. पोलिसांनी कायदा योग्य त्या ठिकाणी न्याय देतील अशी मला अपेक्षा वाटते आहे या तालुक्यांमध्ये विशेषतः जी गुंडगिरी माजलेली आहे सत्तेतील लोक जर गुंडगिरी करायला लागले तर ही निषेधार्थ बाब आहे आजही त्याला शिवसैनिक गुंडगिरीला ठेचण्याचं काम या ठिकाणी करेल. शिवसेना ही गप्प बसणार नाही ॲक्शन विरुद्ध रिएक्शन त्याठिकाणी होईल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी दिली आहे.