*कोकण Express*
*हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंती नमित्ताने आरोग्य शिबीर समोंन बाळासाहेबांची शिवसेना खारेपाटण विभागाचे ज्येष्ठ नागरिक आणि रिक्षा संघटने साठी आयोजन*
आज दिनांक 23 जानेवारी रोजी बाळासाहेबांच्या शिवसेना आणि किरण भैया सामंत संपर्क कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती नीमित्तने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी खारेपाटण ज्येष्ठ नागरिक संघाचे आणि रिक्षा संघटनेचे सुमारे 50 सदस्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्त दाब, ब्लड प्रेशर, शुगर तपासणी, आणि एसिजी तपासणी करण्यात आली. खारेपाटण येथील सुप्रसिद्ध डॉक्टर श्री उमेश बालन, आणि श्री प्रसाद मलंदकर हे जनरल फिजिशियान उपलब्ध होते. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन खारेपाटण सरपंच मान सौ प्राची एस्वळकर यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद शिंदे, Sudhakar dhekane, अस्थळी पवार, सामाजिक कार्यकर्ते गफार काझी, वसीम मुकादम, शाहरुख काझी, प्रणय गुरसाळे, निदा मुकादम, तृप्ती पाटील, सुहास राऊत, सचिन शिंदे, बाबू जाधव, ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री गोडवे साहेब श्री पाटणकर श्री सुरेन्द्र कोरगावकर, हे उपस्थित होते.
यां आरोग्य शिबिरास माजी सरपंच रमाकांत राऊत, सोसायटी, खारेपाटण पं शी प्रसारक मंडळाचे संचालक विजय देसाई, कुरंगवणे सरपंच पपू ब्रम्हडांडे तसेच बाळासाहेबांची शिवसेना राजापूर तालुका अध्यक्ष अशफाक हाजू यांनी सदिच्छा भेट देत शुभेच्छा दिल्या.
उपस्थित होते
कार्यक्रम प्रसंगी खारेपाटण बाळासाहेबांची शिवसेना खारेपाटण विभागाचे आहे मंगेश गुरव आणि सहकाऱ्यांनी सर्व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले सार्वांचे स्वागत केले, तसेच डॉक्टरस चे शाल श्रीफळ देवून सन्मान केला. शिबिर आयोजन करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पाक्षचे सर्व कार्यकर्ते आणि भैया सामंत मित्रमंडळ खारेपाटण यांनी मेहनत घेतली.