*कोकण Express*
*आंगणेवाडी यात्रौत्सवात भाविकांना सोयीसुविधांची कमी पडू देणार नाही ; पालकमंत्र्यांची ग्वाही*
*मालवण ः प्रतिनिधी*
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. यंदा हा आकडा अधिकच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधांची कमी पडता नये, अशा सक्त सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे आयोजित बैठकीत अधिकारी वर्गाला दिल्या. आंगणे कुटुंबीय मंडळ यांच्या मागणीनुसार प्रशासनाने नियोजन पूर्ण करणे आवश्यक आहे. ही जत्रा आपली आहे. याच भावनेतून प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी काम करावे. कामात कोणत्याही त्रुटी राहणार नाही. प्रत्येक काम दर्जेदार व वेळेत पूर्ण झाले पाहिजे. अश्या पद्धतीने काम करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी भराडी देवीचे दर्शन घेत यात्रा नियोजनाचा आढावा घेतला. मालवण तालुका भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वागत केले.

