जल जीवन मिशनसाठी २६ रोजी खास ग्रामसभा

जल जीवन मिशनसाठी २६ रोजी खास ग्रामसभा

*कोकण Express*

*जल जीवन मिशनसाठी २६ रोजी खास ग्रामसभा*

*जिल्हा परिषद प्रशासक प्रजित नायर यांचे आदेश

*ओरोस ता २४*

केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून जलजीवन मिशन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु करण्यांत आला असून या जल जीवन मिशन अंतर्गत प्रजासत्ताक दिनी ग्रामस्तरावर विशेष ग्रामसभा घेण्यांत येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे.
मार्च 2024 अखेरपर्यंत राज्यात “हर घर नल से जल” म्हणून घोषित करण्यांचे उदिदष्ट ठेवण्यांत आले आहे. त्यामुळे 26 जानेवारी रोजी आयोजित ग्रामसभेत जलजीवन मिशनचा विषय प्राधान्याने हाताळण्यांत यावा. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना गुणवत्तेसह पुरेसे अर्थात प्रतिमाणसी 55 लिटर व नियमित स्वरुपात पाणीपुरवठा करण्यांचे उदिदष्ट या उपक्रमांतर्गत करण्यांत आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयांतही या योजनेचे काम योग्य पध्दतीने मार्गी लागावे यासाठी त्यात लोकसहभाग व पारदर्शकता येऊन व्यापक प्रचार व्हावा व नियोजन व्हावे म्हणून 26 जानेवारी 2023 रोजी विशेष ग्रामसभेत हा विषय प्राधान्याने हाताळण्यांत येणार आहे. त्यानुषंगाने ग्रामपंचायत सदस्यांसोबत ग्राम आरोग्य पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांना आमंत्रित करुन विशेष स्थान देण्यांत यावे व समिती सदस्यांची ओळख तसेच त्यांच्या अधिकार व जबाबदारीबाबत उपस्थितांना अवगत करण्यात येणार आहे. गावातील पाणी प्रश्न सोडविण्याकरीता ग्रामस्थानी या ग्रामसभेला उपस्थित राहवे असे आवाहन प्रजित नायर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!