घोणसरी येथे 25जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव

घोणसरी येथे 25जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव

*कोकण Express*

*घोणसरी येथे 25जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव*

*कासार्डे : संजय भोसले*

कणकवली तालुक्यातील घोणसरी येथील गणेश मंदिरात बुधवारी (ता. 25) माघी गणेश जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त नेरुर येथील दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘गर्व परिहार’ हा महान पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे.

बुधवारी दुपारी 12 वा. श्री गणेश जन्म, त्यानंतर तिर्थप्रसाद, दु. 1 ते 3 वा. महाप्रसाद, सायंकाळी 7 ते 9 वा. संगीत भजने सादर होतील. रात्रौ 9 ते 10 वा. फुगडी होणार असून त्यानंतर नेरुर येथील दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘गर्व परिहार’ हा महान पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव गणपती मंदिर ट्रस्ट घोणसरी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!