*कोकण Express*
*सावडाव येथे बालविवाह प्रतिबंध मार्गदर्शन मेळावा*
*कासार्डे ; संजय भोसले*
बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमांतर्गत बालविवाह प्रतिबंध मार्गदर्शन मेळावा अंगणवाडी सावडाव नं. 1 येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास सावडाव च्या नवनिर्वाचीत सरपंच आर्या वारंग यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळा सावडाव नं 1 च्या मुख्याध्यापिका लोकरे, आरोग्यसेविका एस एस माईणकर, आशासेविका रुपाली मेस्त्री व स्नेहलता नरसाळे, CRP स्नेहल नेवरेकर व भक्ती मेस्त्री पालक, किशोरवयीन मुली अंगणवाडी सेविका रेश्मा शेटे, मिनाक्षी फाटक , दिव्या काटे , किर्ती पडवळ उपस्थित होत्या
बालविवाहाविषयी कायदे विषयक माहीती CRP स्नेहल नेवरेकर यांनी दिली. आणि बालविवाहामुळे होणारे शारिरीक व मानसिक दुष्परिणाम यांची माहीती आरोग्य सेविका एस ए माईणकर यांनी दिली. मुख्याध्यापिका लोकरे, पालक उत्तम वारंग यांनी देखिल बालविवाह या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अंगणवाडी सेविका दिव्या काटे यांनी केले.