कनेडीत भाजपा पदाधिकारी व शिवसैनिक एकमेकांसमोर भिडले

कनेडीत भाजपा पदाधिकारी व शिवसैनिक एकमेकांसमोर भिडले

*कोकण Express*

*कनेडीत भाजपा पदाधिकारी व शिवसैनिक एकमेकांसमोर भिडले!*

*परिसरातील वातावरण तंग ; पोलिसांची घटनास्थळी धाव!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

 तालुक्यातील नेहमीच चर्चेत असलेल्या व आपल्या डॅशिंग कार्यपद्धतीमुळे प्रसिद्ध असलेल्या भाजपा पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये कनेडी येथे जोरदार राडा झाल्याचे समजते. त्या पदाधिकाऱ्याने एका कार्यकर्त्याला मारहाण केल्यावरून जाब विचारण्यासाठी या कार्यकर्त्याचे समर्थक त्या पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात घुसले. यावेळी एकमेकांना जोरदार धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते या कार्यालय परिसरात गोळा झाले आहेत. तसेच पोलिसांना माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. अद्याप पोलिसात कोणतीही तक्रार दाखल नसली तरीही परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. अद्यापही वातावरण तंग असून यावेळी ॲडिशनल एस पी नितीन बागाडे घटनास्थळी दाखल झाले आहे. शिवसेना कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यानी ठाण मांडल्याने शिवसेना कार्यालया समोर पोलीस छावणीचे चे स्वरूप आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!