*कोकण Express*
*सावंतवाडी शहरात नाक्या-नाक्यावर विकले जाताहेत अंमली पदार्थ…*
*अर्चना घारे; शासकीय भरती अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी मदत करणार…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शहरातील नाक्या-नाक्यावर दारू आणि अनेक अंमली पदार्थ विकले जात आहेत. मात्र याकडे सर्वाचे दुर्लक्ष आहेत. त्यामुळे अशा प्रकाराच्या विरोधात राष्ट्रवादीच्या माध्यमातून आवाज उठविण्यात येणार आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे, असा इशारा कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे यांनी दिला. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यात भरती प्रक्रिया २५ तारखेपासून सुरू होणार आहे. त्यात ८ हजार १६९ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीकडून मदत करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत सौ. घारे बोलत होत्या.
यावेळी यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, काशिनाथ दुभाषी, ऍड. सायली दुभाषी, राकेश नेवगी, चित्रा बाबर-देसाई, रिद्धी परब, रोहन परब आदी उपस्थित होते.
सौ घारे म्हणाल्या, सावंतवाडी शहरात गेली दोन वर्षे नाक्या-नाक्यावर दारू तसेच अंमली पदार्थ विकले जात आहेत. घरपोच डिलिव्हरी सुद्धा दिली जत आहे. याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष आहेत. नोकऱ्या नसल्यामुळे तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळली आहे. त्याचा फायदा हे अवैध धंदे करणारे घेत आहेत. हे सर्व प्रकार थांबणे गरजेचे आहे. यासाठी महिला राष्ट्रवादी आक्रमक होणार असून रस्त्यावर उतरण्याचीही आमची तयारी आहे, असा इशारा त्यांनी दिला. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्यात ८ हजार १६९ रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया २५ जानेवारी पासून सुरू होणारं आहे. यावेळी हे अर्ज भरण्यासाठी युवक-युवतींना आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून मदत करणार आहोत. तरी या संधीचा फायदा बेरोजगारांना घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

