सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण होऊ देणार नाही ; संदेश पारकर यांचे आव्हान

सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण होऊ देणार नाही ; संदेश पारकर यांचे आव्हान

*कोकण Express*

*सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण होऊ देणार नाही ; संदेश पारकर यांचे आव्हान*

महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज असोसिएशन तर्फे कणकवली पटवर्धन चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर म्हणाले की; सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण होऊ नये अशा प्रकारची भूमिका सर्व एम्प्लॉईज फेडरेशनने घेतली आहे. काही महिन्यापूर्वी अशा प्रकारचं आम्ही आंदोलन केलेलं होतं. त्या आंदोलनाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे होतं. पुन्हा एकदा ही वेळ सर्वांवर येऊन ठेपलेली आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये ज्या बँक आहेत त्या बँकांमध्ये लोकांची विश्वहर्ता आहे. आणि त्या बँकांकडे सर्वसामान्यांच्या बँक आहेत अशा उद्देशाने पाहिलं जातं. सार्वजनिक बँकांमध्ये अनेक लोकांच्या ठेवी बचत सेविंग बँकांमध्ये आहेत. आणि त्या सुरक्षित राहिल्या पाहिजे जर या बँकांचे खाजगीकरण केलं तर या सर्व लोकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकार सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण करण्याच्या उद्देशाने विधेयक आणू पाहताय आहे.
तो त्यांचा प्रयत्न राहणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या ठेवी कर्जदार बचत त्या ठिकाणी पैसा असतो. आणि त्या बँका काही फुटतात त्यावेळी ठेवीदारांचं मोठं आर्थिक नुकसान होतं ज्या ज्या वेळी देशावर अशा प्रकारचे प्रसंग आले त्यावेळी सार्वजनिक बँका त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले जी काही लोकांची बचत असेल की त्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्याचं काम सार्वजनिक बँकांनी केलं. हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या सार्वजनिक बँका आहे. केंद्र सरकारचा जो काही खाजगीकरण करण्याचा डाव आहे तो सर्वांनी आपण आणून पाडला पाहिजे सर्वसामान्यांमध्ये अशा प्रकारची जनजागृती करण्याची गरज आहे त्यांचा घामा कष्टाचा पैसा जो बँकेमध्ये ठेवलेला आहे त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. जो काय खाजगीकरण करण्याचा केंद्रामध्ये डाव सुरू आहे त्या डावाला महाराष्ट्रातील शिवसेना विरोध त्या ठिकाणी करतायेत सर्वसामान्यांचे हित जपायचं असेल तर सार्वजनिक बँक ह्या सार्वजनिक ठिकाणीच असल्या पाहिजे अशी भूमिका शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी यावेळी घेतली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!