*कोकण Express*
*नगर वाचनालय कणकवली तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राजभाषा मराठी वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचा शासन निर्णय आहे.या अनुषंगाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त नगर वाचनालय कणकवली येथे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. दिनांक 25 जानेवारी रोजी प्रथमच विभाग (आठवी ते नववी) सकाळी ११.०० वाजता मराठी भाषेची शुद्धता या विषयावर डॉ. पी.जे .कांबळे सर यांचे व्याख्यान १२.०० वाजता सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व शुद्धलेखन स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. (इयत्ता ५वी)
या सर्व स्पर्धा कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहात देखील होतील. सदर स्पर्धा कणकवली तालुका मर्यादित आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे कार्यवाह श्री.महमद हनिफ आदम पीरखान यांनी केला आहे.