प्रसिद्ध युवा व्याख्याता व सीमाशुल्क अधिकारी, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे २९-३० जानेवारी २०२३ रोजी वैभववाडी तसेच कणकवली येथे स्पर्धा परीक्षा संदर्भात नि:शुल्क व्याख्यानमाला

प्रसिद्ध युवा व्याख्याता व सीमाशुल्क अधिकारी, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे २९-३० जानेवारी २०२३ रोजी वैभववाडी तसेच कणकवली येथे स्पर्धा परीक्षा संदर्भात नि:शुल्क व्याख्यानमाला

*कोकण Express*

*प्रसिद्ध युवा व्याख्याता व सीमाशुल्क अधिकारी, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे २९-३० जानेवारी २०२३ रोजी वैभववाडी तसेच कणकवली येथे स्पर्धा परीक्षा संदर्भात नि:शुल्क व्याख्यानमाला*

महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा व्याख्याते, कोकणचे सुपुत्र, तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, शिक्षण प्रसारक, श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार खालील वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना विविध शासकीय स्पर्धा परीक्षा संदर्भात नि:शुल्क मार्गदर्शन प्रदान करणार आहेत. कोणतेही मानधन अथवा प्रवास भत्ता न घेता विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी त्यांचे हे समाजकार्य अविरत सुरू आहे. कोकणातील व महाराष्ट्रातील शासकीय नोकरभरती मधील टक्का वाढावा यासाठी त्यांनी आजवर शेकडो व्याख्याने घेतलेली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्याने त्यांचे जिल्ह्यासाठी विशेष स्वारस्य आहे.

रविवार, २९ जानेवारी २०२३, सकाळी ८.०० वा. मधुकर सिताराम भुर्के माध्यमिक . विद्यालय, मांगवली, वैभववाडी
सकाळी ११.०० शोभना नारायण विद्यालय, नानिवडे
दुपारी ३.०० वाजता, नाथ पै ज्ञानप्रबोधिनी करूळ, कणकवली

सोमवार, दिनांक ३० जानेवारी २०२३
सकाळी ९.०० वा., सांस्कृतिक भवन माध्यमिक विद्यामंदिर, कनेडी, कणकवली

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या नि:शुल्क मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व काही प्रश्न व शंका असल्यास श्री सत्यवान यशवंत रेडकर सर 9969657820 यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!