न.प.च्या विषय समिती सभापतीपदी नाईक, आडीवरडेकर व दिपाली सावंत यांची निवड

*कोकण Express*

*न.प.च्या विषय समिती सभापतीपदी नाईक, आडीवरडेकर व दिपाली सावंत यांची निवड*

*महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शिवसेनेची बाजी*

सावंतवाडी-दि.२९ डिसेंबर

सावंतवाडी नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शिवसेनेने बाजी मारत सावंतवाडी नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापती पदाची निवड आज बिनविरोध घडवली. भाजपा आणि शिवसेनेचे बालाबल समसमान आहे त्यामुळे भाजप व शिवसेनेने विषय समिती सभापतीपद निवडणुकीत तडजोड केली.

सावंतवाडी नगरपालिकेतील सभापतींचा कार्यकाल संपुष्टात आल्यामुळे या पदांसाठी आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेत गतवर्षीप्रमाणे भाजपचीच सरशी झाली. भाजप व सेनेचे नऊ – नऊ असे समसमान बलाबल असतानाही भाजपने दोन पदे मिळवली. तर सेनेची केवळ एकाच सभापदीपदावर बोळवण करण्यात आली. ही निवड प्रक्रिया बिनविरोध झाली.

यात पालिकेच्या आरोग्य क्रीडा सभापतीपदी भाजपचे नगरसेवक सुधीर आडिवरेकर, उद्यान पाणीपुरवठा सभापतीपदी उदय नाईक तर महिला बालकल्याण सभापतीपदासाठी सेनेच्या नगरसेविका सौ.दिपाली सावंत यांची निवड झाली. तसेच महिला बालकल्याण उपसभापतीपद सेनेच्या सौ.भारती मोरे यांना देण्यात आले.
या निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती उपसभापतींचे नगराध्यक्ष संजू परब व उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी अभिनंदन केले. यावेळी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, ॲड. अनिल निरवडेकर, विशाल परब, गटनेते राजू बेग, नगरसेवक परिमल नाईक, आनंद नेवगी, मनोज नाईक, नासिर शेख, बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विरनोडकर, दीपाली भालेकर, शुभांगी सुकी, बंटी पुरोहित, विनोद सावंत परिक्षीत मांजरेकर आदी उपस्थित होते.

नियोजन जलनिस्सारण व पर्यावरण समिती सभापती पदी उपनगराध्यक्षा सौ अन्नपूर्ण कोरगावकर सदस्य सौ दिपाली भालेकर, सौ समृद्धी विरनोडकर, सुरेंद्र बांदेकर, अनारोजीन लोबो. पाणीपुरवठा उद्यान व पर्यटन समिती सभापती उदय नाईक, सदस्य नाशिर शेख, राजू बेग, शुभांगी सुकी, खेमराज कुडतरकर. आरोग्य क्रीडा व जेष्ठ नागरिक कल्याण समिती सभापती सुधीर आडिवरेकर, सदस्य परीमल नाईक, राजू बेग, अनारोजीन लोबो, सुरेंद्र बांदेकर यांची निवड झाली.महिला व बालकल्याण समिती सभापती सौ दिपाली सावंत, उपसभापती भारती मोरे, सदस्य अनारोजीन लोबो, उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विरनोडकर. स्थायी समिती पदसिद्ध सभापती नगराध्यक्ष संजू परब, सदस्य अन्नपूर्णा कोरगावकर ,उदय नाईक, सुधीर आडिवरेकर, दिपाली सावंत यांची निवड झाल्याचे प्रांताधिकारी तथा निवडणूक अधिकारी सुशांत खांडेकर यांनी जाहीर केले. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी जयंत जावडेकर उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!