आता घरोघरी शासकीय योजनेतून उभारण्यात आलेल्या शौचालयाचे होणार सर्वेक्षण

आता घरोघरी शासकीय योजनेतून उभारण्यात आलेल्या शौचालयाचे होणार सर्वेक्षण

*कोकण Express*

*आता घरोघरी शासकीय योजनेतून उभारण्यात आलेल्या शौचालयाचे होणार सर्वेक्षण*

हागणदारीमुक्त गावसह निर्मलगाव करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागामध्ये शौचालय उभारणीसाठी शासनाने विविध योजनांमधून करोडो रुपयांचे अनुदान दिले आहे.गावा-गावामध्ये अन् घरोघरी मोठ्या संख्येने शौचालयांची उभारणी झालेली आहे. त्याची तपासणी मोहीम शासनाकडून आता सुरू केली आहे. त्यामध्ये शौचालयाच्या सेप्टिक टँकचा फोटो काढून तो अपलोड करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. कागदोपत्री उभारणी दिसत असलेल्या या शौचालयांचा लोकांकडून खरंच उपयोग केला जातो आहे का? याची पडताळणी होणार आहे.
प्रशासनाच्या निर्मलग्राम आणि त्यानंतर हागणदारीमुक्त गाव या अभियानाला गावोगावी लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या योजनांमधून घरोघरी शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. नवीन घराचे बांधकाम करताना शौचालयाची उभारणी करण्याची अट घालण्यात आली. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊन वैयक्तिक अथवा सार्वजनिक शौचालय या माध्यमातून सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानंतर, अनेक गावांमधील घरांमध्ये शौचालयाची उभारणी झाली नसल्याच्या शक्यतेने प्रशासनानेगावागावांमध्ये किती घरांमध्ये किती शौचालयाची उभारणी करण्यात आलेली आहे याचे सर्व्हेक्षण करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!