*कोकण Express*
*हळवल फाट्यावरील अपघातात २ प्रवाश्यांचा मृत्यू ; ६ जण गंभीर जखमी तर उर्वरित प्रवाश्यांवर उपचार सुरू.!*
मुंबई गोवा महामार्गावर सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी खाजगी बस हळवल फाटा या ठिकाणी अवघड वळणावर पलटून अपघात झाल्याची घटना घडली. बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली होती. मात्र यातील २ जणांना आपले प्राण गमवावे लागले तर ६ जण गंभीर जखमी असून उर्वरित प्रवाशांवर उपजिल्हा रुग्णालय कणकवली तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती कणकवली नगरपंचायत चे नगरसेवक गटनेते संजय कामतेकर यांनी दिली. अचानक घडलेल्या या अपघातामुळे आरोग्य यंत्रणेची देखील मोठी धावपळ सुरू झालेली पाहायला मिळत आहे.