*कोकण Express*
*भाजप पुरस्कृत पॅनल कडून एकूण पाच प्रभागासाठी १५ उमेदवारी अर्ज दाखल*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
तालुक्यातील कोलगाव ग्रामपंचायतीसाठी याआधी एकूण १५ उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. भाजप पुरस्कृत पॅनल कडून एकूण पाच प्रभागासाठी १५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक एक मधून संतोष राऊळ, आशिका सावंत, समीक्षा बटवलकर प्रभाग क्रमांक दोन मधून प्रभाकर राऊळ, कस्तुरी नाईक, रोहित नाईक प्रभाग क्रमांक तीन मधून संदीप हळदणकर, रसिका करमळकर, प्रणाली तिळवे प्रभाग क्रमांक चार मधून दिनेश सारंग, आत्माराम चव्हाण, हेमांगी मेस्त्री प्रभाग क्रमांक पाच मधून निनाद पटवर्धन, संदेशा वेंगुर्लेकर, संयोगिता उगवेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
यावेळी भाजप सरचिटणीस महेश सारंग, बळवंत कुडतरकर, अजय सावंत, संदेश राऊळ, दीपक डामरेकर, रामचंद्र करमळकर आदी उपस्थित होते.

