*कोकण Express*
*कुडाळात खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची तक्रार ; तत्काळ कारवाईची मागणी*
केंद्रीय कॅबिनेट मंत्री व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते नारायण राणे वयांच्या बदल खासदार संजय राऊत यांनी लज्जास्पद शब्द वापरून अवमान केल्याबद्दल त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा तसेच या घटनेचा भारतीय जनता पार्टी कुडाळ तर्फे जाहीर निषेध करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संजय राऊत यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी व असे न झाल्यास भारतीय जनता पार्टीतर्फे कुडाळ तालुक्याच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला.
त्यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई, महिला जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे, संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा कार्यकर्णी सदस्य आनंद शिरवलकर, तालुका अध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मौर्य, जेष्ठ नेते मोहन सावंत, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, युवा मोर्चा ता. अध्यक्ष रुपेश कानडे, पप्या तवटे, नगरसेवक गटनेते विलास कुडाळकर, ऍड राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, कु चांदणी कांबळी, शहराध्यक्ष राकेश कांदे, सरचिटणीस देवेन सामंत, राजवीर पाटील, चंदन कांबळी सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.