*कोकण Express*
*कुडाळदेशकर समाज बांधवांच्या पूर्णानंद भवन लोकार्पण व पर्णकुटी सोहळ्याचे २८, २९ रोजी आयोजन*
*सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*
*पूर्णानंद स्वामींच्या पादुकांची निघणार मिरवणूक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुका कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजसेवा मंडळाच्या वतीने तालुक्यातील फोंडाघाट येथील पूर्णानंद भवन या वास्तूचा लोकार्पण सोहळा व पूर्णानंद पर्णकुटी प्रवेशारंभ सोहळ्याचे आयोजन २८ व २९ जानेवारी रोजी फोंडाघाट येथील पूर्णानंद भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार २८ रोजी सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत पूर्णानंद पर्णकुटी वास्तुशांती सोहळा, १२.३० ते १ वाजेपर्यंत आरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता पूर्णानंद स्वामींच्या पादुकांचे श्री मठ संस्थान दापोली येथून फोडाघाट येथील गणेश मंदिर, वालावलकर पेट्रोल पंपाजवळ येथे आगमन. सायंकाळी ४.३० वाजता पादुका व स्वामी प्रतिमेची मिरवणूक, सायंकाळी ७ ते ७.३० वाजेपर्यंत पर्णकुटी येथे स्वामींच्या पादुकांचे स्वागत, सायंकाळी ७.३० ते ८ वाजेपर्यंत स्वामींच्या प्रतिमेचे पूजन व आरती. व त्यानंतर भजने. रात्री ८:३० नंतर महाप्रसाद. रविवार २९ रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून मान्यवरांच्या हस्ते स्वामींच्या पादुकांचे पूजन. सकाळी ९ ते ११ पूर्णानंद स्वामींच्या पादुकांचा दर्शन सोहळा. सकाळी १० ते २ पूर्णानंद भवन येथे सत्यनारायणाची पूजा, ११ ते २ पूर्णानंद भवन लोकार्पण सोहळा. दुपारी २ ते ३ स्नेहभोजन. सायंकाळी ३.३० ते ४.३० हळदीकुंकू समारंभ. सायंकाळी ४.३०वाजता स्वामी पदुकांचे दाभोली मठाच्या दिशेने प्रस्थान. सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत तीर्थप्रसाद, भजने, रात्री १० वाजता जेवण. त्यानंतर चेंदवणकर दशावतारी नाट्य मंडळाचे दशावतारी नाटक होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा कुडाळदेशकर समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन दत्तकुमार उर्फ सुरेश सामंत यांनी केले आहे.