साळगाव माऊली मंदिर,झाराप माजरेकर दुकान ते माणगाव तिठा या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा

साळगाव माऊली मंदिर,झाराप माजरेकर दुकान ते माणगाव तिठा या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा

*कोकण Express*

*साळगाव माऊली मंदिर,झाराप माजरेकर दुकान ते माणगाव तिठा या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा..!*

*जिल्हाध्यक्ष रामचंद्र (आबा) भोई:अन्यथा ७ फेब्रुवारी पूर्वी रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास माणगाव खोऱ्यातील सकल ग्रामस्थांच्या वतीने मुख्य रस्त्यावर उपोषण करण्याचा इशारा..*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

गेली कित्येक वर्ष झाराप मांजरेकर दुकान ते माणगाव तिठा,साळगाव माऊली मंदिर ते साळगाव ग्रामपंचायत ते माणगाव तिठा रस्ते पूर्णपणे वाहून खड्डेमय आणि साईट पट्ट्या खचून अपघाताला आमंत्रण देत आहे माणगाव पुण्यभूमीत देश-विदेशातून हजारो भक्त,पर्यटक येतात तसेच माणगाव खोऱ्यातील हद्दीतील स्थानिक नागरिक आपल्या दैनंदिन तसेच मूलभूत गरजांचे अनुषंगाने ये जा करतात रस्ता तात्काळ दुरुस्तीबाबत कारवाई सुरू करावी.रस्ते दुरुस्तीबाबत अद्याप कारवाई झालेली नाही ही बाब खेदजनक तसेच जनहित विरोधी आहे. तात्काळ दुरुस्ती करावी यासाठी राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल सिंधुदुर्ग जिल्ह्याध्यक्ष रामचंद्र (आबा) भोई यांनी कार्यकारी अभियंता (बांधकाम) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे.
रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आपल्या विभागाकडून होणाऱ्या कारवाईबाबत लेखी स्वरूपात कळविण्यात यावे अन्यथा कुडाळ तालुक्यातील साळगाव माऊली मंदिर, मांजरेकर दुकान ते माणगाव तिठा या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कारवाई ७ फेब्रुवारी पूर्वी न झाल्यास माणगाव खोऱ्यातील सखल ग्रामस्थांच्या वतीने आपल्या विभागास कोणती कल्पना न देता साळगाव माणगाव मुख्य रस्त्यावर दळणवळणासारखी मूलभूत गरज विचारात घेऊन उपोषणास बसावे लागेल असा इशारा राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रामचंद्र उर्फ आबा भोई यांनी उपकार्यकारी अभियंता सिंधुदुर्ग यांना इशारा दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!