*कोकण Express*
*केंद्रीयमंत्री राणेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांवर कारवाई करा*
*भाजपा जिल्हाध्यक्ष तेली यांची मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेना खा.संजय राऊत यांनी केंद्रीयमंत्री राणेंबद्दल काढलेल्या अपशब्दांचा भाजपा निषेध करत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी यासाठी संजय राऊत मुद्दाम भाजपा नेत्यांबद्दल अपशब्द वापरून प्रसिद्धीच्या झोतात राहतात. खा. संजय राऊत यांच्या प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली.