*कोकण Express*
*बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचा वर्धापन सोहळा व बॅ नाथ पै पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन*
बॅरिस्टर नाथ पै पुण्यतिथी व नाथ शिक्षण संस्थेचा वर्धापन सोहळा बुधवार दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी आयोजित केलेला आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बॅरिस्टर नाथ पै कोकण डेव्हलपमेंटच्या संस्थापक अध्यक्षा अदिती पै, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, कमलताई परुळेकर, जयप्रकाश चमनकर, प्रदीप नेरुरकर, अशोक येजरे, जयराम डिगसकर व नाथ पै प्रेमी हे उपस्थित राहणार आहेत..
*याच कार्यक्रमांमध्ये बॅ. नाथ पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त निमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे*.
तसेच याच दिवशी सायंकाळी सहा वाजता संस्थेतील विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे (स्नेहसंमेलन) आयोजित करण्यात आलेले आहे
तरी सर्व सर्वांना विनंती आहे, की सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी …संयोजक श्री उमेश गाळवणकर व सहकारी.