*कोकण Express*
*कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटचे प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक*
*फोंडाघाट ःःप्रतिनिधी*
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती कणकवली आयोजित कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२२-२३ माध्यमिक विद्यालय नाटळ ता.कणकवली येथे संपन्न झालेल्या विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल,फोंडाघाट प्रशालेने प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला . गोविंद राजाराम बालेघाटकर व कु.दूर्वा रंजीत रेवडेकर यांनी प्राथमिक गटात यश मिळवल्याबद्दल व त्यांना मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक श्री.एम.डी. लाड सर व सौ. पेडणेकर मॅडम यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी चेअरमन, सेक्रेटरी,खजिनदार व सर्व संचालक तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले.