*कोकण Express*
*न्यू इंग्लिश स्कूल जुनिअर कॉलेज फोंडाघाट प्रशालेमध्ये हार्ट फुलनेस मेडिटेशन शिबिर संपन्न*
*फोंडाघाट ःःप्रतिनिधी*
न्यू इंग्लिश स्कूल जुनिअर कॉलेज फोंडाघाट प्रशालेमध्ये हार्ट फुलनेस मेडिटेशन शिबिर संपन्न गुरुवार दिनांक 10 जानेवारी2023 रोजी न्यू इंग्लिश स्कूल जुनिअर कालेज फोंडाघाट या प्रशालेमध्ये फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी आयोजित हायस्कूलनेस एज्युकेशन ट्रस्ट पुणे मार्फत मेडिटेशन संदर्भात तीन दिवसीय शिबिर संपन्न झाले. या शिबिरासाठी उद्योजिका मानसिक दीपक माजगांवकर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरासाठी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुभाष सावंत सेक्रेटरी चंद्रशेखर लिंग्रस खजिनदार आनंद मरये सर्व संचालक माजी विद्यार्थी ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचा उद्देश हारटफुलनेस प्रोग्राम द्वारे लोकांना विद्यार्थ्यांना संतुलित जीवन जगण्याचा मार्ग देते. विद्यार्थ्यांचा वैयक्तिक विकास व शैक्षणिक प्रगती करण्यास मदत होते.आजच्या धावपळीच्या स्पर्धेच्या काळात हारटफुलनेस मेडिटेशनची किती आवश्यकता आहे हे देखील आलेल्या ट्रेनच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले.पुणे येथील अंजली बापट मॅडम डॉ.गोपाळ सर डा.गायकवाड सर शुभम सर खांडेकर सर त्याचबरोबर इतर ट्रेनर ने देखील विद्यार्थ्यांना व पालकांना मेडिटेशन ची गरज व महत्त्व सांगितले.या कार्यक्रमाबरोबर आजूबाजूच्या इतर शाळांमध्ये बँकांमध्ये देखील मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.त्याचबरोबर वैयक्तिक व्यक्तिगत मार्गदर्शन देखीलकेले गेले.या टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत असून या टीमने आम्हांला असेच मार्गदर्शन करावे असे उपस्थित वर्गातून विचार व्यक्त केले गेले .व त्याची पूर्तता देखील आम्ही करू असे आश्वासन या टीम द्वारे करण्यात आले.