कणकवली सभापती तळेकर यांचा राजीनामा

कणकवली सभापती तळेकर यांचा राजीनामा

*कोकण Express*

*कणकवली सभापती तळेकर यांचा राजीनामा*

*भाजपा पक्ष नियमानुसार कालावधी संपताच कणकवली सभापती तळेकर यांचा राजीनामा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

भाजपा पक्षाच्या नियमानुसार सभापती पदाचा कालावधी संपताच आज कणकवली सभापती दिलीप तळेकर यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.नाईक यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केला.
यावेळी बांधकाम सभापती बाळा जठार, माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे,महेश गुरव, सोनू सावंत,पंचयत समिती सदस्य मनोज रावराणे,सरपंच सुहास राणे आदी उपस्थित होते.

सभापती दिलीप तळेकर यांनी आपल्या कारकिर्दीत कोरोना काळ असतानाही खूप चांगले काम केले. प्राथमिक शाळा कोरोना मुळे बंद असतांना शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम राबवून जिल्हयात आदर्श काम केले.त्याच बरोबर आरोग्य व्यवस्था तालुक्यात व्यवस्थित सांभाळली.पोहीला कोरोना पॉझिटिव्ह कणकवली तालुक्यात मिळाल्यानंतर महत्वाची कामगिरी बजावून आरोग्य कर्मचारी आणि जनता यांच्यातील दुवा बनून काम केले होते.त्यांच्या या कामाचे आमदार नितेश राणे यांनी कौतुक केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!