स्थानिक लोकांना हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून सेवेत सामावून घेण्याची हमी द्या आणि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम सुरू करा ; उपसरपंच हेमंत मराठे

स्थानिक लोकांना हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून सेवेत सामावून घेण्याची हमी द्या आणि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम सुरू करा ; उपसरपंच हेमंत मराठे

*कोकण Express*

*स्थानिक लोकांना हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून सेवेत सामावून घेण्याची हमी द्या आणि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम सुरू करा ; उपसरपंच हेमंत मराठे*

सावंतवाडी शहरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नियोजित जागेवर काही कारणास्तव हॉस्पिटल उभारले जाऊ शकत नसल्याचे वृत्त समजले.सावंतवाडी,वेंगुर्ला,दोडामार्ग जनतेची गेले कित्येक वर्षाची मागणी आहे की शासनाने शासकीय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे. यासाठी अनेकांनी प्रयत्न केले.मात्र ज्या जागेवर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उभारले जाणार होते त्या जागेवर हॉस्पिटल उभारण्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाले आहेत.मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर झाल्याने गेले कित्येक वर्षांपासून ची जनतेची असलेली मागणी पूर्ण झाली होती.मात्र ते आता जागा नसल्याने रद्द झाल्यास सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग तालुक्यातील जनतेला पुन्हा एकदा यां मल्टिस्पेशिलिटि हॉस्पिटल करिता प्रतीक्षा करावी लागेल.यामुळे जनतेचे हित लक्षात घेवून सदरचे मल्टिस्पेशिलिटि हॉस्पिटल जागे अभावी रद्द होऊ नये यासाठी मळेवाड येथे मराठे कुटुंबीयांच्या मालकीची जागा हॉस्पिटल करिता विना मोबदला देण्याची तयारी मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी दर्शविली आहे .तसेच मळेवाड कोंडूरे गावासह दशक्रोशितील व्यक्तींना यां मल्टिस्पेशिलिटि हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून घेण्याची हमी दया आणि हॉस्पीटल कामाला सुरुवात करा असेही मराठे यांनी सूचित केले आहे.तरी प्रशासनाने आता वेळ न काढता यावर तात्काळ कार्यवाही करावी असेही मराठे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!