*कोकण Express*
*कनिष्ठ गट सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत कनेडी हायस्कूलची चमक*
*३ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*
सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनची ५ वी कनिष्ठ गट जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा दि. ७ व ८ जानेवारी २०२३ रोजी मुख्य प्रशासकीय इमारत, वेंगुर्ला नगरपरिषद येथे संपन्न झाली. सदर स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मोरारीराव सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कॅरम खेळाचे प्रदर्शन करून उज्वल यश संपादन केले आहे. सदर स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी खालीलप्रमाणे-*
*१) कु. दिक्षा नंदकिशोर चव्हाण इ. ११वी (१८ वर्षाखालील गट)*
*२) पियुष प्रशांत चव्हाण इ. ७वी (१४ वर्षाखालील गट)*
*३) कु. दिव्या नंदकिशोर चव्हाण (इ. ७वी) (१२ वर्षाखालील गट)*
*सदर यशस्वी विद्यार्थ्यांनी दादर मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
क. ग. शि. प्र. मंडळ, मुंबईचे अध्यक्ष सन्मा. श्री. सतीशजी सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्व यशस्वी खेळाडूंना प्रशालेतील संस्कृत तथा इंग्रजी अध्यापक श्री. मकरंद आपटे, क्रीडा शिक्षक श्री. बयाजी बुराण व जिल्ह्यातील नामवंत कॅरम खेळाडू श्री. गौतम यादव यांचे मार्गदर्शन लाभले.