नागवे तलाठी प्राची खरात यांचे आकस्मिक निधन

*कोकण Express*

*नागवे तलाठी प्राची खरात यांचे आकस्मिक निधन…*

*कणकवली, ता.२८:*

तालुक्यातील नागवे गावच्या तलाठी प्राची संतोष खरात (शालिनी येडगे) वय ४१ यांचे कोल्हापूर येथे आकस्मिक आजाराने उपचारादरम्यान रविवारी रात्री निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
प्राची खरात- येडगे यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान रविवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांनी यापूर्वी देवगड, वैभववाडी तालुक्यात तलाठी म्हणून काम केले होते. मालवण येथील नायब तहसीलदार तथा महसूल कर्मचारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष खरात यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्‍चात एक मुलगी,एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर कोल्हापूर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!