*कोकण Express*
*शिडवणे नं.१ शाळेत स्कुल किटचे वितरण*
*दि शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियाचे साहाय्य*
*सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई यांचे सौजन्य*
*कासार्डे ; संजय भोसले*
नुकतेच शिडवणे नं. १ शाळेतील ५१ विद्यार्थ्यांना दि शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या आर्थिक सहकार्याने व सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई यांच्या सौजन्याने स्कुल किटचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या शुभहस्ते स्कुल किटचे वाटप करण्यात आले.
त्यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ , उपाध्यक्षा समिता सुतार , मनोहर कोकाटे , अनिल पांचाळ , दिनेश रांबाडे , तारीफ शेख , सचिन टक्के , निलेश टक्के , श्रीराम पाष्टे , मंगेश सुतार , स्नेहा पांचाळ , मुख्याध्यापक सुनिल तांबे , प्रवीण कुबल, सुजाता कुडतरकर , सीमा वरुणकर आणि पालकवर्ग उपस्थित होते.
सदर कार्यक्रम संपन्न होण्यासाठी शिडवणे कोनेवाडी येथील सचिन पाटणकर आणि प्रशांत कुडतरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याबद्दल मदतीचा हात देणाऱ्या सर्वांचे ग्रामपंचायत , शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.