उद्योजक किरण उर्फ़ भैयाशेठ सामंत याच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

उद्योजक किरण उर्फ़ भैयाशेठ सामंत याच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

*कोकण Express*

*उद्योजक किरण उर्फ़ भैयाशेठ सामंत याच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

रत्नसिंधू महत्त्वकांक्षी योजनेचे राज्य समितीचे सदस्य उद्योजक किरण उर्फ़ भैयाशेठ सामंत याच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवेसेना पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

1) देवगड़ कुणकेश्वर मंदीरामधे लघुरूद्र व महाप्रसाद.

2) वैभववाड़ी दत्त मंदिर येथे अभिषेक व फळवाटप.

3) कणकवली ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये फळवाटप

कणकवली राममंदिर येथे लघुरूद्र व महाप्रसाद.

4) फोंडघाटं येथे खेळ पैठनीचा होम मिनिस्टर स्पर्धा.

5) आचरा येथे मेडिकल कॅम्प, आचरा रामेश्वर मंदिरा मध्ये लघुरूद्र व अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मठमधे लघुरूद्र

6) मालवण येथील सरकारी हॉस्पिटल मधे फळवाटप व खाऊवाटप

7) सविता आश्रम, आनद आश्रम, दिविजा आश्रम असलदे येथे धान्य वाटप.

8) कुडाळ मधे कुडाळेश्वर मंदिरामध्ये अभिषेक, कातकरी, आदिवासी वस्तीमधे खाऊवाटप व धान्यवाटप

नाग्या महादू शाळेमधे खाऊवाटप असे कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमाच्यामध्ये विविध पक्षातील कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत.

या सर्व कार्यक्रमाला बाळासाहेबांची शिवसेनेच्या जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, भास्कर राणे, महेश तेली, नीलेश तेली आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!