आमदार नितेश राणेंमुळे 10 दिवसांत जिल्ह्यातील शालेय एसटी च्या सर्व फेऱ्या होणार पूर्ववत सुरु

आमदार नितेश राणेंमुळे 10 दिवसांत जिल्ह्यातील शालेय एसटी च्या सर्व फेऱ्या होणार पूर्ववत सुरु

*कोकण Express*

*आमदार नितेश राणेंमुळे 10 दिवसांत जिल्ह्यातील शालेय एसटी च्या सर्व फेऱ्या होणार पूर्ववत सुरु*

*एसटी रिजनल मॅनेजर श्रीनिवास जोशीं सोबत झालेल्या सकारात्मक चर्चेत जिल्ह्यातील शालेय , कॉलेज विद्यार्थ्यांना दिलासा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आमदार नितेश राणेंमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय आणि कॉलेज च्या बंद असलेल्या सर्व एसटी फेऱ्या पूर्ववत सुरू होणार आहेत. आज एसटी चे रिजनल मॅनेजर श्रीनिवास जोशी यांच्याशी आमदार नितेश राणे यांनी ओम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्गातील एसटी च्या दुरावस्थेबाबत जोशी यांच्याशी केलेल्या सविस्तर चर्चेनंतर जोशी यांनी येत्या 10 दिवसांत प्राधान्याने सर्व शालेय, कॉलेज एसटी फेऱ्या पूर्ववत सुरू करण्याच्या सूचना प्रभारी डिसी प्रशांत वासकर याना दिल्या. यावेळी आमदार नितेश राणे यांनी जोशी यांना सिंधुदुर्ग हा ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागातील शालेय, कॉलेज विद्यार्थी वाहतुकीसाठी पूर्णपणे एसटी वर अवलंबून आहेत. सध्या जिल्ह्यात एसटी च्या शालेय फेऱ्या बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे होत असलेले शालेय नुकसान होऊ नये यासाठी त्वरित जिल्ह्यातील सर्व शालेय एसटी फेऱ्या सुरू करा अशी सूचना केल्या. यासाठी आवश्यक लागणारा निधी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सत्तेतील आमदार म्हणून मिळवून देण्याची जबाबदारी माझी अशी ग्वाहीही आमदार नितेश राणेंनी दिली. येत्या 10 दिवसांत जिल्ह्यातील शालेय एसटी फेऱ्या पूर्ववत सुरळीत सुरू केल्या जातील असे रिजनल मॅनेजर जोशी यांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी स्थानक, डेपोंची दुरावस्था , आदी समस्यांकडे आमदार नितेश राणे यांनी एसटी चे मॅनेजिंग डायरेक्टर यांचे लक्ष वेधले होते.त्यानुसार रिजनल मॅनेजर जोशी यांनी आज सिंधुदुर्गात येत आमदार नितेश राणेंची जिल्ह्यातील एसटी विषयक समस्यांबाबत रिजनल मॅनेजर जोशी यांना सिंधुदुर्गातील एसटी च्या समस्यांवर तातडीने तोडगा काढून रिझल्ट ओरिएंटेड काम करण्याबाबत आपल्या अधिकाऱ्यांना आदेश देण्याबाबतही आमदार नितेश राणे यांनी सूचना केली. सध्या सिंधुदुर्गातील एसटी फेऱ्या टायर अभावी बंद आहेत. एसटी स्टँड मधील बंद फॅन मुळे प्रवाशांचे होणारे हाल, शौचालयांमध्ये अस्वच्छता, बस डेपो ची दुरावस्था7 आदी समस्यांबाबत सकारात्मक चर्चा होत रिजनल मॅनेजर जोशी यांनी प्रभारी डिसी प्रशांत वासकर यांना तातडीने सुधारणा करण्याची सूचना केल्या.प्रत्येक तालुक्यासाठी एक पालक अधिकारी नेमून येत्या 10 दिवसांत जिल्ह्यातील सर्व शालेय फेऱ्या सुरू करण्याबाबत चे आदेशही6 रिजनल मॅनेजर जोशी यांनी प्रभारी डिसी वासकर यांना दिल्या. यावेळी एसटी इंटक कामगार संघटनेचे कोकण प्रदेश सचिव तथा सिंधुदुर्ग अध्यक्ष अशोक राणे, उप यंत्र अभियंता सुजित डोंगरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!