*कोकण Express*
*तळेरे विद्यालयाच्या प्रा.आशा कानकेकर यांना कोकणरत्न पुरस्कार*
*कासार्डे ; संजय भोसले*
वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रा आशा बाळकृष्ण कानकेकर यांना कोकणरत्न पुरस्कार 2022 प्राप्त झाला. कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. बाळाराम पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन प्रा। आशा बाळकृष्ण कानकेकर यांना गौरविण्यात आले. प्रा. अशा बाळकृष्ण कानकेकर या नेहमीच शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात अग्रणी असतात. गेली 20 वर्षे तळेरे सारख्या ग्रामीण भागात त्या ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. त्या स्वतः प्राध्यापक योग्यता परीक्षा उत्तीर्ण असून कोकण बोर्ड रत्नागिरी येथे बारावी परीक्षा हिंदी विषयाचे मुख्य नियमक या मानाच्या स्थानावर उत्तम कामगिरी बजावली आहे. विभाग स्तरावर वेळोवेळी हिंदी विषयाचे मार्गदर्शन इतर शिक्षक परीक्षार्थींना केले आहे. त्यांनी केलेल्या सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम कार्याची दखल घेऊन त्यांना कोकणरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भावनात झालेल्या भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . याप्रसंगी माजी कोकण सिंचन महामंडळ उपाध्यक्ष मा. संदेश पारकर उपस्थित होते . या पुरस्काराबद्दल तळरे पंचक्रोशी प्रसारक मंडळाचे श्रीकृष्ण खटावकर, सर्व सदस्य, प्राचार्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.