नारकरवाडी उत्कर्ष मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाला आमदार नितेश राणे यांनी दिली भेट

*कोकण Express*

*नारकरवाडी उत्कर्ष मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाला आमदार नितेश राणे यांनी दिली भेट.*

*कोकिसरे नारकरवाडी येथे आमदार नितेश राणे यांचा सत्कार*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

कोकिसरे नारकरवाडी उत्कर्ष मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाला आमदार नितेश राणे यांनी भेट दिली. नारकरवाडी येथील अंबाबाई देवालयात अखंड हरिनाम सप्ताह निमित्त रविवारी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार नितेश राणे यांनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. व सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, पं.स. सभापती अक्षता डाफळे, राजेंद्र राणे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, स्नेहलता चोरगे, प्राची तावडे, मंडळाचे अध्यक्ष रमेश नारकर, यशवंत नारकर, जनार्दन नारकर, संदीप नारकर, प्रदीप नारकर, दाजी पाटणकर, राजाराम नारकर व मंडळाचे कार्यकर्ते, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!