नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये बालिका दिन मोठ्या उत्साहात संपन्न

नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये बालिका दिन मोठ्या उत्साहात संपन्न

*कोकण Express*

*नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये बालिका दिन मोठ्या उत्साहात संपन्न* 

*कासार्डे; संजय भोसले*

आदर्श एज्युकेशन सोसायटी खारेपाटण संचालित नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये बालिका दिन उस्फूर्तपणे संपन्न झाला.

स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसानिमित्त प्रतिवर्षी बालिका दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसमोर मान्यवर पराग शंकरदास यांनी दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला श्रद्धापूर्वक पुष्पहार अर्पण केला. समूह संगीतगायनातून सावित्रीबाई फुले यांना कृतज्ञतापूर्वक सन्मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी मान्यवर पराग शंकरदास यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रति सन्मान आणि कृतज्ञता अभिव्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कर्षासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक सरदार निकम, सहशिक्षक राधेश्याम पांडेय, सहशिक्षिका सोनाली पाटील यांनी तसेच इयत्ता पहिली ते नववीतील विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तव्यांतून सावित्रीबाई फुले यांची स्त्री शिक्षण चळवळ आणि त्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी जिद्दीने सहन केलेली उपेक्षा व महात्मा फुले यांच्या पाठिंब्यातून त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या चळवळीतून आजच्या स्त्री शिक्षणाच्या नांदीची गाथा प्रबोधित केली.

सदर कार्यक्रमांतर्गत विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवपर प्रशस्तीपत्रके मान्यवर पराग शंकरदास, विद्यालयाचे मुख्याध्यापक सरदार निकम तसेच जेष्ठ सहशिक्षक राधेश्याम पांडेय यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे सहशिक्षक ओंकार गाडगीळ यांनी केले व सूत्रसंचालन नबिया काझी  या विद्यार्थिनीने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!