कणकवली शेतकरी संघाची निवडणूकीसाठी ७ जानेवारीला मतदान

कणकवली शेतकरी संघाची निवडणूकीसाठी ७ जानेवारीला मतदान

*कोकण Express*

*कणकवली शेतकरी संघाची निवडणूकीसाठी ७ जानेवारीला मतदान*

*१४ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात, एक बिनविरोध;भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात थेट लढत*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात थेट लढत होत आहे.१५ पैकी एक जागा बिनविरोध झाल्याने १४ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात असून मतदान ७ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत कणकवली पंचायत समितीच्या जुनी इमारत येथे होणार आहे.या मतदानानंतर त्याच ठिकाणी अर्ध्यातासाने मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी के. आर. धुळप यांनी दिली.

या निवडणुकी अंतर्गत प्राथमिक शेती सहकारी संस्था ७ जागांसाठी १३ उमेदवार, इतर प्रकारच्या संस्था १ जागेसाठी २ उमेदवार, व्यक्ती सदस्य प्रतिनिधी २ जागेसाठी ४ उमेदवार,महिला प्रतिनिधी २ जागांसाठी ४ उमेदवार, इतर मागास प्रवर्ग १ जागेसाठी २ उमेदवार, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत.अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून भाजपचे गणेश तांबे हे बिनविरोध झाले आहेत. १४ जागांसाठी भाजप- शिंदे गटाचे १४ तर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे १३ उमेदवार रिंगणात आहेत.

प्राथमिक शेती सहकारी संस्था मतदारसंघातून भाजप- शिंदे गटाकडून किरण गावकर, सुरेश ढवळ, अतुल दळवी, श्रीपत पाताडे, रघुनाथ राणे, संजय शिरसाट व प्रशांत सावंत असे सात उमेदवार रिंगणात आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून दीपक कांडर, रावजी चिंदरकर, राजेंद्र राणे, संजय रावले, रविकांत सावंत व राजेंद्र सावंत असे सहा
उमेदवार रिंगणात आहेत.

इतर प्रकारच्या संस्था मतदारसंघातून एका जागेसाठी शिंदे गटाचे मिथील सावंत व शिवसेनेचे श्रीकांत राणे यांच्यात थेट लढत होत आहे. व्यक्ती सदस्य प्रतिनिधी गटातून भाजपचे प्रकाश सावंत, गुरूप्रसाद वायंगणकर व सेनेचे प्रकाश घाडीगावकर व सुभाष सावंत यांच्यात थेट लढत होत आहे. महिला प्रतिनिधीसाठी भाजपच्या लीना परब, स्मिता पावसकर व सेनेच्या स्वरूपा विखाळे, सुधा हर्णे यांच्यात लढत होत आहे. इतर मागास प्रवर्गातून भाजपचे सदानंद हळदिवे व शिवसेनेचे उमेश वाळके यांच्यात लढत होत आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून भाजपच्या विनीता बुचडे व सेनेचे जयेश धुमाळे यांच्यात लढत होत आहे,असे निवडणूक निर्णय अधिकारी के. आर. धुळप सांगितले.

मतदान प्रक्रिया ..
कणकवली खरेदी विक्री संघ मर्यादित कणकवली या संघासाठी ७ जानेवारीला मतदान होणार आहे. मतदार संघ जागेनिहाय मत पत्रिका असणार आहेत. जर मतदाराने आवश्यक असलेल्या उमेदवारांच्या संख्येपलीकडे मतदान केल्यास ते मतदान बाद ठरवण्यात येणार आहे,असेही धुळप यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!