*कोकण Express*
*जिल्ह्यास्तरीय निबंध स्पर्धेत कोमल पाताडे हिचे यश*
*कासार्डे ;संजय भोसले*
२४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयीन गटात कुमारी कोमल शिवराम पाताडे (ज्युनि. कॉलेज कासार्डे) हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन गटात(इ.११ वी व १२ वी) ‘जागो ग्राहक जागो’ या विषयावर निबंध सादर करण्यात आला होता.
सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.दादासाहेब गीते यांच्या अध्यक्षतेखाली स्वामी समर्थ मंगल कार्यालय जामसंडे, य/ता.देवगड येथे पार पडला.
यावेळी ग्राहक जनजागृतीसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दादासाहेब गीते यांच्या शुभहस्ते ग्राहक मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला.नायब तहसिलदार श्रीकृष्ण ठाकूर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य सदस्य व जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील,पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे,एसटी चे विभागीय वाहतूक नियंत्रक प्रशांत वासकर,कृषी अधिकारी कैलास ढेपे,देवगड पुरवठा निरीक्षक शिवराज चव्हाण, कुडाळ पुरवठा निरीक्षक नरेंद्र एडके,जिल्हा पुरवठा कार्यालयातील बी.टी मांजरेकर, संस्थेच्या जिल्हा सहसचिव श्रीम.सामिया चौघुले, देवगड अध्यक्ष लक्ष्मण पाताडे, कणकवली अध्यक्ष नामदेव जाधव व मालवण अध्यक्ष रत्नाकर कोळंबकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी श्री. गीते यांनी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ विषयी माहिती दिली. संस्थेचे राज्य सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.सुरेश पाटील यांनी ग्राहक चळवळ, ग्राहकांचे हक्क, अधिकार आणि कर्तव्ये, ग्राहक संरक्षण कायदा- १९८६,सुधारित ग्राहक संरक्षण कायदा-२०१९, ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला देवगड तालुक्यातील व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रदीप कदम यांनी केले.आभार कुडाळ पुरवठा विभागाचे निरीक्षक नरेंद्र एडके यांनी मानले