*कोकण Express*
*माळगाव (तालुका मालवण) येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरात ७२ नेत्र रुग्णांची मोफत नेत्र तपासणी*
*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन व लायन्स आय हॉस्पिटल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन*
*कासार्डे ; संजय भोसले*
माळगाव तालुका मालवण येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरा मध्ये ७२ नेत्र रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
माळगांव तालुका मालवण पंचक्रोशीतील नेत्र रुग्णांसाठी ३१ डिसेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन व लायन्स आय हॉस्पिटल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ डिसेंबर २०२२ रोजी रोजी सकाळी १० ते २ या वेळेत ॲड.गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश हायस्कूल माळगाव या ठिकाणी संपन्न झाले.
या शिबिरात ७२ नेत्र रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन डॉ.संतोष खोत मांळगाव यांच्या हस्ते झाले. तसेच या शिबिराला उपस्थित ॲड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जोशी तसेच माळगांव सरपंच सौ.चैताली चेतन साळकर त्याचप्रमाणे ह्यूमन राइटचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष मनोज तोरस्कर, तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, सचिव राजेश कुमार लब्दे तसेच डॉ.तांबे, डॉ. कदम, ह्युमन राइटचे मालवण तालुका खजिनदार रितेश सावंत, अर्जुन परब , रोहित हडकर, ऋषिकेश कोरडे,श्री. हळवलकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.